
पिंपरी (Pclive7.com):- श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान व साह्यकडा ऍडव्हेंचर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होतो. एक पाऊल आरोग्याकडे या ब्रीद वाक्य घेऊन यावेळेचे हे ३ रे वर्ष होते. यावर्षी सुद्धा परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेत भाग घेतला. सकाळी ६ वाजता या मॅरेथॉन ला सुरुवात झाली.
सुरुवातीला झुंबावरती सर्वांनी डान्स केल्यानंतर १० किलोमीटर, ५ किलोमीटर, ३ किलोमीटर अशा रूटवरती स्पर्धक धावले. या मॅरेथॉनसाठी चीफ गेस्ट म्हणून अर्जुन पुरस्कार विजेते श्रीरंग इनामदार हे होते. या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे व बाबाजी चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. या मॅरॉथॉनला सुमारे १ हजार लोकांनी सहभाग घेतला होता. सर्व स्पर्धक धावून आल्यानंतर सर्वांना नाश्ता व चहाची व्यवस्था केली होती. त्यानंतर पुन्हा झुम्बा डान्स झाला. त्यानंतर विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमासाठी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
























Join Our Whatsapp Group