पिंपरी (Pclive7.com):- रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे आणि सेक्टर २३ निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक कामे करण्यात येणार आहेत. त्याकरिता गुरुवारी (दि.३०) रोजी पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा होणार असून सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. शुक्रवारचा पाणीपुरवठा देखील विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.

रावेत येथील जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक कामे आणि सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक, पाणीपुरवठा विषयक नियमित कामे केली जाणार आहेत. त्यासाठी गुरुवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. महापालिकेमार्फत गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागातील सायंकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही. पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारचा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.






















Join Our Whatsapp Group