पिंपरी (Pclive7.com):- पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने १३ वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना रविवारी (दि. २) पहाटे अजंठानगर, चिंचवड येथे घडली.

निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास सात ते आठ जणांचे टोळके अजंठानगर परिसरात आले. त्यांनी लाकडी दांडके, दगड तसेच इतर हत्यारांनी परिसरातील तेरा वाहनांची तोडफोड केली. या घटनेतील एका आरोपीची ओळख पटलेली आहे. तो २०१७ मध्ये अजंठानगर परिसरातून इतर ठिकाणी राहण्यास गेला आहे. पूर्ववैमनस्यातून त्याने हे कृत्य केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात वारंवार वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. गेल्याच महिन्यात पिंपरी आणि काळेवाडी परिसरात वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. टोळक्याकडून होणाऱ्या तोडफोडीमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.






















Join Our Whatsapp Group