पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रहाटणी येथील शाळेतील करण गायकवाड या विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्याचे महापौर माई ढोरे यांनी गुरूवारी (दि. ६) अभिनंदन केले. तसेच त्याचा सत्कारही केला. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, भाजपच्या नगरसेविका आरती चोंधे उपस्थित होते.
करण गायकवाड हा महापालिकेच्या रहाटणीतील प्राथमिक शाळेत चौथीचा विद्यार्थी आहे. तो किक बॉक्सिंगचा खेळाडू आहे. त्याची या खेळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ९ ते १३ फेब्रुवारी यादरम्यान नवी दिल्ली येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी महापौर माई ढोरे यांनी करण गायकवाडला शुभेच्छा दिल्या.






















Join Our Whatsapp Group