पिंपरी (Pclive7.com):- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या रायरेश्वराच्या शिवलायात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, त्या रायरेश्वराची प्रतिष्ठापना कृष्णानगर, चिंचवड येथे १९९८ मध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील हे रायरेश्वराचे दुसरे ऐतिहासिक मंदिर आहे. या रायरेश्वर प्रतिष्ठानतर्फे महाशिवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी विविध विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्र उत्सवाची सुरुवात शिवजंयतीच्या कार्यक्रमाने करून यात विविध कार्यक्रमांचे आयोजन रायरेश्वर प्रतिष्ठान कृष्णानगर येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती रायरेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत भैरवकर यांनी दिली. या कार्यक्रमांमध्ये दि १९ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करून शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. यावेळी यावेळी या प्रभागाचे नगरसेवक एकनाथ पवार, केशव ढेकणे, बापू सोनावणे, आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
आजपासून पुढील तीन दिवस महाशिवरात्र उत्सवा निमित्त दररोज सायंकाळी ७ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत सुश्राव्य कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. २० फेब्रुवारी रोजी ह.भ.प. महादेव महाराज ढाकणे आळंदी देवाची यांचे सुश्राव्य कीर्तन, दि. २१ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. संतोष महाराज काळोखे विठ्ठलवाडी,देहूगाव यांचे सुश्राव्य कीर्तन, २२ फेब्रुवारी रोजी विनोदाचार्य ह.भ.प. नरेंद्र महाराज गुरव मालेगांवकर यांचे सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तरी या कार्यक्रमाचा लाभ आसपासच्या नागरिकांनी घ्याव्या, अशी विनंती रायरेश्वर प्रतिष्ठान कृष्णानगर चिंचवड, पुणे १९ च्या विश्वस्तांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group