पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडी दापोडी परिसरात घरफोडी, छेडाछाडीचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांना सुरक्षितपणे राहणे व प्रवास करणे कठीण झाले आहे. तरी लवकरात लवकर बीट मार्शल यांच्याद्वारे रात्री व दिवसाची गस्त वाढविण्यात यावी जेणे करून नागरिकांना सुरक्षित वाटेल अशी मागणी भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांना निवेदनद्वारे केली आहे.
यावेळी पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, आशीर्वाद महिला बचत गटाचे अध्यक्ष शीला मामी जाधव, तात्या तापकीर, सुवर्णा कुटे, रुत जेकब, रेखा थोरात, रेश्मा चार्य, जुबेदा शेख, उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group