पिंपरी (Pclive7.com):- छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास दाखवणाऱ्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेचा शेवट झाला.त्याचक्षणी मालिकेच्या निर्मितीचा संपुर्ण प्रवास डोळ्यासमोर आला.. आमचे लहान बंधू श्री अरविंद तावरे यांच्या मुक्ती विज्युअल्स निर्मित ‘जागरण’ या मराठी चित्रपटाच्या वेळी डॉ.अमोल कोल्हे यांची झालेली मैत्री “स्वराज्यरक्षक संभाजी” मालिका निर्मितीच्या निमित्ताने आणखी घट्ट होत गेली. एखाद्या मालिकेच्या निर्मितीमध्ये किती चढउतार असतात हे जवळून पाहण्याचा, अनुभवण्याचा आणि त्यातून यशस्वी मार्ग काढण्याचा, सहनिर्माता म्हणून डॉ.अमोल कोल्हे, डॉ.घनश्याम राव आणि विलासकाका सावंत यांच्या बरोबर आलेला प्रसंग आयुष्यातील एक विलक्षण अनुभव देणारा होता.. छत्रपती संभाजी महाराजांवरील प्रेम व डॉ.अमोल कोल्हे यांची मैत्रीमुळे मालिकेच्या निर्मितीमध्ये आणि महाराष्ट्राला अभिप्रेत असणारा संभाजी महाराजांचा खरा इतिहास महाराष्ट्रात नव्हे तर सातासमुद्रापार लहानापासून थोरांपर्यंत पोहोचविता आला व यामध्ये खारीचा वाटा उचलता आला, याचा मला सार्थ अभिमान आहे..
सर्वसामान्यांपर्यंत धाकल्या धन्यांची शौर्यगाथा कमी वेळात सहज पोहोचविता यावी यासाठी शिवपुत्र संभाजी महानाट्याची झालेली निर्मिती, त्या महानाट्याचा बारामतीत झालेला प्रयोग आणि त्याचदरम्यान डॉ.अमोल कोल्हे यांचा झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश ते लोकप्रिय खासदार या सर्व घडामोडींचे साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं याचा एक बारामतीकर म्हणून सार्थ अभिमान वाटतो.. हे सगळं केवळ अविस्मरणीय…






















Join Our Whatsapp Group