पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज शुक्रवारी (दि. 20) कोरोनाचा आणखी एक ‘पॉझिटीव्ह’ रूग्ण आढळला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 12 वर गेली आहे. संबंधित रुग्ण हा फिलिपिन्स येथून प्रवास करून आलेला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड मिळून करोनाबाधितांची संख्या आता 21 झाली आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 52 झाली आहे.
कोरोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच, फ्लूसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया व युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशांमधून आलेल्या सर्व नागरिकांनी किमान 14 दिवस घरांमध्येच होम ‘क्वॉरनटाईन’ करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.






















Join Our Whatsapp Group