पिंपरी (Pclive7.com):- सध्या पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावत आहे. त्यासाठी कोरोना विषाणूपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने युवानेते पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागर येथे विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका सौ.शीतलताई काटे यांच्या वतीने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तसेच महिलांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रभागातील सोसायटी मध्ये औषध फवारणी करण्याच्या सूचनाही नाना काटे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच पिंपळे सौदागर, रहाटणी प्रभागातील विविध सोसायटीमध्ये बाहेर देशातून आलेले जे नागरिक आहेत त्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १४ दिवस स्वतः क्वारंटाईन मध्ये राहण्यासाठीची माहिती देऊन जनजागृती केली जात आहे. तसेच बचाव हाच उपचार आहे. याप्रमाणे नागरिकांनी स्वताची वैयक्तिक काळजी घ्यावी व सुरक्षेवर भर द्यावा असे आवाहन विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केले आहे.