पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने युध्दपातळीवर उपायोजना सुरू केल्यात. पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे १२ रूग्ण पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून महापालिकेच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे. वाकडमधील सुर्दशन कॉलनी, सद्गुगुरू कॉलनी परिसरात नगरसेविका अश्विनी वाघमारे तसेच युवानेते विक्रम वाघमारे यांच्या पुढाकाराने कोरोना विषाणू प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात आली.

प्रभाग क्रमांक २५ वाकड, तथावडे व पुनावळेमध्ये कोरोना विषाणूंचा प्रतिबंध करण्यासाठी औषध फवारणीची मोहीम राबविण्यात आली. नगरसेविका अश्विनी वाघमारे आणि युवानेते विक्रम वाघमारे हे स्वत: या मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी महापालिका कर्मचारी व अधिकारी यांच्यासोबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.गेल्या दोन दिवसांपासून प्रभागात ही औषध फवारणीची मोहीम सुरू आहे.






















Join Our Whatsapp Group