पिंपरी (Pclive7.com):- कोरोना विरोधात उपाययोजना म्हणून सरकारने लॉकडाऊनचे आदेश दिलेत. सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापना बंद आहेत. पोलीसांकडून घराबाहेर न पडण्याचे तसेच गर्दी न करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र शहरातील घरगुती गॅस सिलेंडर वितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. आज (गुरूवारी) प्राधिकरण सेक्टर २८ येथील भारत गॅस एजन्सीजवळ नागरिकांनी संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत मोठी गर्दी केली होती. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती असून सरकारच्या आदेशाची पायमल्ली या कारणामुळे होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजना करून शहरातील गॅस वितरण व्यवस्था सुरळीत करावी, जेणे करून नागरिक घरातून बाहेर पडणार नाहीत. अशी मागणी सर्व सामान्य नागरिक करत आहेत.
राज्यासह संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट आलयं. या भयानक आजाराला हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिल पर्यंत देश ‘लॉकडाऊन’ केलायं. सर्वत्र संचारबंदी लागू आहे. सरकारच्या या निर्णयाला पिंपरी चिंचवडकरांनी उत्स्फूर्तपणे पाठींबा दर्शविला आहे. त्यामुळेच गेल्या पाच ते सहा दिवसांत शहरातील कोरोग्रस्त रूग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही. नागरिकांनी अत्यावश्यक कारणांसाठीच घरातून बाहेर पडणे पसंद केलयं. मात्र शहरातील घरगुती गॅस सिलेंडरची वितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडर गरजेचाच असल्यामुळे तो संपल्यानंतर नवा गॅस खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडू लागले आहेत. गॅस सिलेंडरची कमतरता तो असल्यामुळे खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असून सरकारच्या आदेशाची पायमल्ली या कारणामुळे होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजना करून शहरातील गॅस वितरण व्यवस्था सुरळीत करावी, जेणे करून नागरिक घरातून बाहेर पडणार नाहीत. अशी मागणी सर्व सामान्य नागरिक करत आहेत.






















Join Our Whatsapp Group