पिंपरी (Pclive7.com):- राज्यासह संपूर्ण देशावर कोरोनाचं मोठं संकट आलं आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सरकारने लॉकडाऊनची अंमलबजावणी केलीयं. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आलीयं. म्हणूनच सामाजिक बांधिलीचे भान राखत पिंपरी चिंचवड शहर शिवसेना व पंचशिल फाऊंडेशन यांनी गरजू गोरगरिबांना मदतीचा हात दिलायं.

पिंपरी चिंचवड शहर शिवसेना व पंचशिल फाऊंडेशन यांच्या वतीने शहरातील विविध भागात राहणाऱ्या गोरगरीब गरजू सुमारे ५०० कुटूंबांना किराना साहित्याचे वाटप करण्यात आले. भाटनगर, चिखली, लालटोपीनगर, आंबेडकरनगर, काळेवाडी या भागात माजी उपशहर प्रमुख गुलाब गरूड, शिवसेना समन्वयक पिंपरी विधानसभा माधव मुळे, उपशहरप्रमुख युवराज कोकाटे, खंडु शिरसाट, गणेश आहेर, भाग्यश्री मस्के यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.






















Join Our Whatsapp Group