पिंपरी (Pclive7.com):- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा ‘लॉकडाउन’ सुरू आहे. या ‘लॉकडाउन’च्या काळात सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा भागविण्यासाठी त्यांना किमान दोन वेळचे जेवण मिळावे याकरिता पिंपरी चिंचवड शहरातील युवानेते झिशान सय्यद यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आझमभाई पानसरे युथ अँड सोशल वेल्फेअर असोसिएशन व झिशानभाई सय्यद युवामंच वतीने सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. यामध्ये दैनंदिन गरजा भागविण्यासाठी जो किराणा सामान व अन्नधान्य याची गरज असते, या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप झिशान सय्यद यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविले जात आहे.

संपूर्ण देशात लॉकडाउन काळात आपण आपआपल्या शहरातील, गावातील गरजू नागरिकांची मदत करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. या भावनेतून आपण आपल्या आझमभाई पानसरे युथ अँड सोशल वेल्फेअर असोसिएशन व झिशानभाई सय्यद युवामंच वतीने सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत असल्याचे झिशान सय्यद यांनी सांगितले आहे. दरम्यान नुकतेच झिशान सय्यद यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करता सफाई कामगारांना मदतीचा हात दिला होता. सफाई कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप झिशान सय्यद यांनी केले होते.






















Join Our Whatsapp Group