मुंबई (Pclive7.com):- मद्यविक्री दुकानांबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करूनच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राजेश टोपे यांनी ट्विट करताना सांगितलं आहे की, लॉकडाउनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करूनच अंतिम तो निर्णय जाहीर केला जाईल. दरम्यान याआधी फेसबुकवर संवाद साधताना त्यांनी मद्यविक्री दुकाने खुली करण्याचे संकेत दिले होते.
राजेश टोपे यांनी फेसबुकवर संवाद साधताना एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं होतं की, “जर सोशल डिस्टन्सिंच्या नियमांचं योग्य पालन केलं तर दारुच्या दुकांनावर कोणतीही बंदी असणार नाही” मात्र यावेळी त्यांनी दारुची दुकानं कधी सुरु होतील याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नव्हती. यानंतर त्यांनी ट्विट करत मद्यविक्री दुकानांबाबात काटेकोरपणे नियमावली तयार करूनच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल असं स्पष्ट केलं आहे.
राजेश टोपे यांनी यावेळी बोलताना माहिती दिली की, “सोमवारी नवीन ४६६ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून राज्याची एकूण संख्या झाली ४६६६ झाली आहे. आजपर्यंत ५७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी नऊ तर आतापर्यंत २३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे”. “काही छोट्या चाचण्यादेखील करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामध्ये एक्स रे चाचणी तसेच एसपीओटू पल्सऑक्सिमीटर चाचणी करण्यावर भर देणार,” असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. “हायड्रोक्लोरोक्विनमुळे प्रतिबंधात्मक शक्ती वाढते म्हणून मुंबईत काही भागात या गोळ्या वाटपासाठी मान्यता दिली आहे. मात्र, ज्यांना हृदयविकार आहे किंवा ६० वर्षांवरील आणि १५ वर्षाखालील व्यक्तींना त्या दिल्या जाणार नाहीत,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.






















Join Our Whatsapp Group