पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाने दुसरा बळी घेतला आहे. निगडी भागातील रहिवाशी असलेल्या आणि पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबधित ६२ वर्षीय महिलेचा आज सोमवारी (दि.२०) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. शहरातील कोरोनामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे.
या महिलेला १८ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. महिलेचे वय ६२ होते. निगडी भागात राहणारी ही महिला होती. या महिलेवर पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, या महिलेला नेमकी कोरोनाची लागण कशी झाली होती, याची माहिती समजू शकली नाही. या महिलेच्या संपर्कातील चार जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.
पिंपरी चिंचवडमध्ये आजपर्यंत ६२ कोरोनाचे ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर १८ रुग्ण हे ‘कोरोनामुक्त’ झालेले आहेत. तसेच सध्या शहरात ४२ कोरोनाचे रुग्ण असून ३६ जणांवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर उर्वरित ६ जणांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.






















Join Our Whatsapp Group