पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभर लॉकडाऊन सुरू करण्यात आला होता. पिंपरी चिंचवडमध्येही महापालिकेच्या माध्यमातून सुरू असेलेली कामे बंद करण्यात आली होती. मात्र आता सरकारने लॉकडाऊनमधील निर्बंध शिथील केले आहेत. त्याअनुषंगाने नगरसेविका निर्मला कुटे यांनी पिंपळे सौदागर, रहाटणी प्रभागातील ठप्प झालेली विकास कामे पुन्हा सुरू करण्याची मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार आज (दि.०५) पिंपळे सौदागर प्रभागातील शिवसाई लेन, सेवन स्टार लेन, स्वराज चौक, येथील रस्त्याचे काॅंक्रिटीकरणाची कामे व इतर विकास कामांस सुरूवात करण्यात आली आहे.
नगरसेविका निर्मला कुटे यांनी आज प्रभगातील विकास कामांची पाहणी करून आवश्यक त्या सुचना संबंधित विभागाला दिल्या. यावेळी पिंपळे सौदागर स्मार्ट सिटी विभागाचे प्रमुख चव्हाण उपस्थित होते.
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पिंपरी चिंचवड शहरासह संपुर्ण देशभरामध्ये लाॅकडाऊन लागु करण्यात आलायं. परंतु या लॉकडाऊनमध्ये पिंपळे सौदागर प्रभागातील विकासकामे, स्मार्ट सिटीची कामे, कुणाल आयकाॅन रोडवरील पाण्याच्या टाकिचे काम, स्थापत्य विषयक रस्त्यांची कामे चालू करून पावसाळ्यापूर्वी शक्य ती कामे लवकरात लवकर पुर्ण करावी अशी मागणी नागरिकांकडून होत होती. त्यानुसार चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका निर्मला कुटे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून या प्रभागातील कामे सुरू करून घेतली आहेत. लॉकडाऊन तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून ही कामे सुरू राहतील असा विश्वास निर्मला कुटे यांनी व्यक्त केलायं.






















Join Our Whatsapp Group