मुंबई (Pclive7.com):- विधानपरिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: उमेदवार असल्याने या निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब येऊन विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते.
मतांचं गणित पाहून काँग्रेसने दुसऱ्या जागेचा हट्ट सोडल्याने आता महाविकास आघाडी पाच जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर भाजपने चार जागांवर दावा केला आहे. संख्याबळ पाहता महाविकास आघाडी पाच आणि भाजपच्या चार जागा निवडून येतील, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.
दरम्यान, भाजपने आपल्या उमेदवारांचे अर्ज यापूर्वीच भरले आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार आज आपले अर्ज दाखल करत आहेत. एकूण ९ जागांपैकी शिवसेना २, राष्ट्रवादी २ आणि काँग्रेस १ तर भाजप ४ जागा लढवणार आहे.























Join Our Whatsapp Group