पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी तसेच इंद्रायणी सहकारी बँकेचे संचालक वसंतराव बाबुराव कुदळे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. काळेवाडी येथील ‘रागा पॅलेस’मध्ये बुधवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कुदळे यांना अभिष्टचिंतन केले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष वसंतनाना लोंढे, माजी नगरसेवक हरेश आसवानी, रंगनाथ कुदळे, शांती सेन, चंद्रकांत भोळे, सुरेश म्हेत्रे, राजेंद्र गावडे, नगरसेविका प्रियंका कुदळे, निकिता कदम, इंद्रायणी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष एस. बी. चांडक, उपाध्यक्ष महेश चांडक, संचालक सुरेश जुमानी, जयहिंद बँकेचे संचालक बापू आल्हाट, पिंपरी-चिंचवड हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कुदळे, ‘सकाळ’चे जाहिरात व्यवस्थापक मिलिंद भुजबळ, माजी सहायक आरोग्य अधिकारी प्रकाश जवळकर, युवा नेते ऋषिकेश संजोग वाघेरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वसंत तावरे, कामता प्रसाद पटेल, निमगाव दुडेचे सरपंच रामभाऊ गायकवाड, दिशा सोशल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष संतोष बाबर, संचालक भरत आल्हाट, प्रबोधनकार शारदा मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी इंद्रायणी सहकारी बँकेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष एस. बी. चांडक आणि संचालक सुरेश जुमानी यांच्या हस्ते वसंतराव कुदळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कुदळे यांच्या प्रशासकीय कारकिर्दीचा, सामाजिक बांधिलकीचा आणि सहकार क्षेत्रातील योगदानाचा गौरव करत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमात ‘सरगम ग्रुप’च्या वतीने संगीतमय मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे उपस्थितांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आनंददायी वातावरणाचा अनुभव घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वसंतराव कुदळे यांचे चिरंजीव विक्रम कुदळे व विशाल कुदळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन श्रीकांत कदम यांनी केले, तर शिक्षण मंडळाच्या माजी सभापती गिरीजादेवी प्रवीण कुदळे यांनी आभार प्रदर्शन केले.



















Join Our Whatsapp Group