पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास आज (दि.१२) आमदार अण्णा बनसोडे यांनी परिचारिका दिना निमित्ताने भेट दिली. यावेळी त्यांनी परिचारिकांचे प्रश्न समजून घेतले.
यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. वाबळे, मनपा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, अभिमान भोसले व रुग्णालयाच्या अधिसेविका आणि मोठ्या संख्येने परिचारिका उपस्थित होत्या. परिचारिकांनी काम करताना येणाऱ्या अडचणींचा पाढाच आमदार बनसोडे यांच्यासमोर मांडला असता, आमदार बनसोडे यांनी रुग्णालयाची सुरक्षा, कर्मचार्यांना संरक्षण, वेतन वाढ, पदोन्नती आदी प्रश्ना सोडविण्यासाठी तातडीने मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. कोविड 19 वार्ड मध्ये काम करणाऱ्या परिचारिकांशी चर्चा केली व त्यांचे मनोबल वाढविले.
यापूर्वी आमदार बनसोडे यांनी या कोरोना रुग्णालयातील कक्षात काम करणाऱ्यासाठी आमदार निधीमधून शहरातील YCM रुग्णालयास ४५ लाख व जिल्हा रुग्णालयास ५ लाख रुपये निधी PPT कीट खरेदी करण्यासाठी दिलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोनासाठी आवश्यक निधी कमी पडणार नाही परंतू कोरोना साथीच्या वेळी होणाऱ्या खर्चामध्ये भ्रष्टाचार झाल्यास कोणत्याही आणि कितीही उच्च पदस्त अधिकारी अथवा कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही. YCM च्या भेटी नंतर आमदार बनसोडे यांनी तत्काळ मनपा आयुक्त हर्डीकर यांची भेट घेऊन YCM रुग्णालयातील प्रश्नाबाबत चर्चा केली.
यावेळी झालेल्या चर्चेत रुग्णालयाची सुरक्षा वाढवणे, कंत्राटी कर्मचारी वर्गास धोकादायक काम करीत असल्याने वाढीव भत्ता तसेच कोरोना कक्षात काम करीत असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गास क्वारंटाइन रजा देण्यात बाबत आयुक्त सकारात्मक कार्यवाही करणार असल्याची माहिती आमदार बनसोडे यांनी दिली.























Join Our Whatsapp Group