पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी येथील ६८ वर्षीय महिलेचे रिपोर्ट आज (दि.१३) ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील आजपर्यंच्या कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १७५ वर पोहचली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी आलेल्या अहवालात रहाटणी येथील एक ६८ वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले असून तिला महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात सध्या कोरोनाच्या ‘पॉझिटिव्ह’ ५२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर शहरात आजपर्यंत शहरात आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७५ झाली आहे. दरम्यान या भयानक आजारातून पूर्णपणे बरे होऊन ‘कोरोनामुक्त’ झालेल्या रुग्णांची संख्या १११ एवढी आहे. तर शहरातील ४ आणि महापालिका हद्दीबाहेरील पाच अशा ९ रूग्णांचा आजपर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.























Join Our Whatsapp Group