पिंपरी (Pclive7.com):- नवी सांगवीतील स्वामी विवेकानंदनगर येथील रस्त्याचे काम पिंपरी चिंचवड महापालिकेने त्वरित पूर्ण करावे अशी मागणी स्थानिक रहिवसी करत आहेत.
नवी सांगवी येथील स्वामी विवेकानंदनगर येथे लॉकडाऊन चालू होण्यापूर्वी जानेवारी महिन्यात रस्त्याचे काम पिंपरी चिंचवड महापालिकेकडून सुरू करण्यात आले होते. मात्र हे काम लॉकडाऊनमुळे अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना वाहने आतमध्ये आणता येत नाहीत. मुख्य रस्त्याला वाहने लावल्यास त्यांचे नुकसान होत आहे. तसेच येथील कच्चा रोडनी जात असताना अनेक वेळा महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तरी महापालिकेने पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे अशी स्थानिक नागरिक नागरिक प्रसाद पवार यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group