पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त महापालिका प्रशासकीय इमारतीतील त्यांचे प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक हे उपस्थित होते. त्यानंतर निगडी येथील महाराणा प्रतापसिंह यांचे पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते पुष्षहार अर्पण करण्यात आला. यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्या सुमन पवळे, कमल घोलप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, राजपूत समाज संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार बायस, सुरेश सुर्यवंशी, श्रीराम परदेशी, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. आमदार महेश लांडगे, उपमहापौर तुषार हिंगे, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसदस्य उत्तम केंदळे यांनीही पुष्षहार अर्पण करून अभिवादन केले.























Join Our Whatsapp Group