पिंपरी (Pclive7.com):- कोरेनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत चालला आहे. पुण्यातील येरवडा येथील एका महिलेचा आज (दि.२५) उपचार सुरू असताना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोनाचा हा १७ वा बळी असून त्यातील १० रूग्ण हे शहराबाहेरील रहिवासी होते. दरम्यान आज किवळे, आनंदनगर चिंचवड, भाटनगर, सांगवी येथील १४ रूग्णांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले असून त्यात ८ पुरूष आणि ६ महिलांचा समावेश असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली.
महापालिकेने आज सकाळी ११.३० वाजता दिलेल्या कोरोनाच्या अहवालानुसार पुणे येरवडा येथील एका महिलेचा वायसीएम रूग्णालयात मृत्यू झाला आहे. तसेच आज १४ नवे कोरोनाचे रूग्ण बाधित आढळले आहेत. किवळे, आनंदनगर चिंचवड, भाटनगर, सांगवी आणि येरवडा येथील १४ रूग्णांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आलेत. सध्या शहरातील १६७ कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार सुरू असून आजपर्यंतची बाधित रूग्णांची संख्या ३६७ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत १७० रूग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना ‘डिस्चार्ज’ देण्यात आला आहे. दरम्यान कोरोनामुळे शहरात १७ जणांचा मृत्यू झाला असून त्यातील १० रूग्ण हे शहराबाहेरिल होते.























Join Our Whatsapp Group