पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या अंत्यविधीसाठी स्मशान दाखला आवश्य लागतो. त्यासाठी वायसीएम तसेच जिजामाता रूग्णालयात जावे लागते. मात्र याठिकाणी अनेक कोरोनाच्या रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत या रूग्णालयात मृत व्यक्तीचे नातेवाईक हा दाखला घेण्यासाठी गेल्यास त्यांना कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ऑनलाईन’ स्मशान दाखला देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विनोद नढे यांनी केली आहे.
यासंदर्भात विनोद नढे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या अंत्यविधीसाठी स्मशान दाखला आवश्य लागतो. मात्र तो दाखला मिळवण्यासाठी जिजामाता हॉस्पिटल तसेच वायसीएम रूग्णालयात जावे लागते. सध्या शहरात कोरोनाच्या रूग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाच्या बहुतांश रूग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे स्मशान दाखला घेण्यासाठी एखादा व्यक्ती तिथे गेल्यास त्याला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. महापालिकेने अनेक परवानग्या व सेवा ऑनलाईन पध्दतीने सुरू केली आहे. पुणे महापालिका देखील ऑनलाईन पध्दतीनेच स्मशान दाखला देते. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने देखील ऑनलाईन स्मशान दाखला देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी विनोद नढे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group