पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युतविषयक देखभाल दुरुस्ती आणि पाणी वितरण व्यवस्थेतील दुरूस्तीच्या कामांसाठी गुरुवारी (दि.२८) महापालिकेकडून शहरात सायंकाळी करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा देखील अनियमित होण्याची शक्यता असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
पाणीपुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युतविषयक देखभाल दुरूस्ती, निगडी, पेठ क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत आणि पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करण्यात येणार आहे. त्याशिवाय, शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे देखील करावी लागणार आहे. त्यासाठी गुरुवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे त्या दिवशी शहरामध्ये सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. मात्र, सायंकाळचा पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. तसेच, शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा देखील अनियमित होण्याची शक्यता असल्याचे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.























Join Our Whatsapp Group