पिंपरी (Pclive7.com):- आनंदनगरमधील नागरिकांना प्राधिकरणात ‘क्वारंटाईन’ करण्यास विरोध केल्याप्रकरणी नगरसेवक राजू मिसाळ आणि अमित गावडे यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
चिंचवड स्टेशन आनंदनगर झोपडपट्टीत कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच महापालिका प्रशासनाने आनंदनगरमधील नागरिकांना प्राधिकरणातील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी (पीसीसीओई) महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली होती. मात्र त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू मिसाळ आणि शिवसेनेचे नगरसेवक अमित गावडे यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. तेथील प्रवेशव्दारावर गेल्या चार दिवसांपासून ते तिथे तळ ठोकून होते.
अखेर पोलिसांनी या प्रकरणी नगरसेवक राजू मिसाळ आणि अमित गावडे यांना ताब्यात घेतले असून पुढील योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे रावेत चौकीचे पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने म्हणाले.























Join Our Whatsapp Group