पिंपरी (Pclive7.com):- कोरोना महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कोरोना मुक्त असलेल्या निगडीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत सेक्टर २२ मध्ये संकल्प युवा प्रतिष्ठान या मंडळाच्या माध्यमातून सोमवार दि.०१ जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये तब्बल १२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे आयोजन संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रबुद्ध लिंबराज कांबळे यांनी केले होते.
आजपर्यंत या भागामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही. त्यामुळे या कोरोनाच्या लढ्यात आपलेही काही विशेष योगदान असावे या उद्देशाने स्वत:हून नागरिक या कार्यक्रमाला आले होते. सामाजिक अंतर व स्वच्छतेचे नियम पाळून लहान, मोठ्यांसह महिलांनीही रक्तदान केले. यामध्ये विशेष सहकार्य लाभले ते म्हणजे क्रांती सामाजिक विकास संघटना, कामगार संघर्ष संघटना, एस एम बॉईज निगडी, छत्रपती साम्राज्य निगडी, श्री युवा प्रतिष्ठान निगडी, साई प्रतिष्ठाण, स्वाभिमानी युवा प्रतिष्ठान, रोशन युवा प्रतिष्ठाण निगडी, व इतर सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला विशेष सहकार्य केले आहे. त्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष प्रबुध्द लिंबराज कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले. या प्रभागाचे लोकप्रिय नगरसेवक सचिन चिखले यांनी या कार्यक्रमाला भेट दिली. या वेळेस नियाजभाई खान, कुतबुद्दीन होबळे, गणेश अवघडे, शिवाजी साळवे, संजय ससाणे, गणेश वाघमारे, सुजित धोत्रे, शारुख खान, अरुण जोगदंड, अनिकेत साळुंखे, रवी खैरनार, सनी पवार, किशोर हतागळे, निलेश चखाले आदी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group