पिंपरी (Pclive7.com):- कोरोना विरूद्धच्या लढ्यात शासकीय यंत्रणेसह विविध सेवाभावी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती आपापल्या परीने योगदान देत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक तानाजी खाडे यांनी वाढदिवसानिमित्त स्वखर्चातून निगडी येथील संपुर्ण से.२२ मधील रहिवाश्यांना मदतीचा हात दिला आहे. तानाजी खाडे व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सरसकट सर्वांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात येत आहे.
लॉकडाऊन सुरू असल्याने उद्योग व्यवसाय बंद झाल्यामुळे निगडी से.२२ मध्ये राहणार्या कष्टकरी कामगारांचे, रोजंदारी कामगारांचे, छोटे व्यावसायिक, फेरीवाले, टपरीवाले, पथारीवाले यांचे व्यवसाय अचानकपणे ठप्प झाले आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना आर्थिक व अन्नधान्याची टंचाई भासत आहे. या बाबींची जाण ठेवत खाडे यांनी हा उपक्रम चालू केला आहे. यामुळे त्यांच्या या कार्यात अनेक सामाजिक कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत. खाडे यांच्याकडून करण्यात येणार्या या मदतीने गोरगरीब जनता भारावून गेली. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभारही मानले आहेत.
या उपक्रमाबाबत बोलताना तानाजी खाडे म्हणाले की, माझ्या वाढदिवसानिमीत्त से.२२, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील सर्व रहिवाश्यांना अन्नधान्य किट वाटप करण्यात येत आहे. अन्नधान्य किट वाटपाचे काम तिन दिवसांपुर्वीच चालू करण्यात आलेले आहे. आम्ही दररोज ३०० कुटूंबांना अन्नधान्य किट देत आहोत. आपणही या समाजाचं काही तरी देणं लागतो या भावनेतून माझे कुटूंब, जिवाभावाचे कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही हा उपक्रम पार पाडत आहोत. यासाठी योग्य ते नियाेजन करण्यात येत आहे. हि मदत नसून आमचे कर्तव्य आहे. तसेच लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका, पोलिस, प्रशासन, वैद्यकीय व आरोग्य विभागांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन तानाजी खाडे यांनी केले आहे.























Join Our Whatsapp Group