मावळ (Pclive7.com):- निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यातील अनेक गावांमधील घरांचे तसेच शेड वरील पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेती, घरे, पॉलीहाऊस, पोल्ट्री, शाळांचेही नुकसान झाले आहे. गुरूवारी सकाळी सात वाजल्यापासून नुकसान झालेल्या गावांना भेटी देत झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष जाऊन पाहणी आमदार सुनिल शेळके अधिकाऱ्यांना सोबत घेऊन केली आहे. तसेच नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रातांधिकारी यांनी सर्व ग्रामसेवक, तलाठी यांना वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे तातडीने आदेश दिले आहेत. प्रमुख रस्त्यांवर पडलेली झाडे बाजुला करण्याच्या सुचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. या वादळामुळे लहान मुले, महिला जखमी झाले आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपुस करुन त्यांना धीर दिला.
यावेळी आमदार सुनिल शेळके यांच्यासोबत प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, सुदाम कदम, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले व इतर पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group