पिंपरी (Pclive7.com):- आमदार महेश लांडगे व कामगार नेते सचिन लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरीत भाजपा युवा मोर्चाच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान केले गेले. ७ जून रोजी निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, जयगणेश साम्राज्य, इंद्रायणीनगर भोसरी येथे सकाळी १० ते ५ या कालावधीत १२२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिवराज सुदामराव लांडगे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच रक्तदान शिबिरांची आवश्यकता बोलून दाखविली होती. देशात व राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत भाजपा युवा मोर्चा यांनी भाजपा पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात, गर्दी टाळत अनोख्या रक्तदान शिबिराचे आयोजन केले. रविवारी सकाळी दहा वाजता शिबिराला सुरुवात झाली. त्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत सुमारे १२२ लोकांनी रक्तदान केल्याचे आयोजक शिवराज लांडगे यांनी सांगितले.
या शिबीराला प्रामुख्याने आमदार महेश लांडगे, टाटा युनियन मोटर्सचे अध्यक्ष सचिन लांडगे, भाजपा युवा अध्यक्ष संकेत चोंधे, युवानेते योगेश लांडगे, नगरसेवक दिनेश यादव, प्रदेश सदस्य अनुप मोरे, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत लांडगे, महिला पदाधिकारी गीता महेंद्रू, अविरत श्रमदानचे डॉ. निलेश लोंढे, भाजपा उद्योग आघाडीचे निखिल काळकुटे, सायकल ग्रुपचे सुनील सैंदाणे, रा.स्व.संघचे शहर कार्यवाहक विलास लांडगे, बजरंग दल इंद्रायणी नगर प्रखंडचे नवनाथ सकोरे व अरविंद लांघे, सोसायटी फेडरेशनचे विनय रावल तसेच सुकन्या फाऊंडेशनचे अमित गुप्ता यांची ह्या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
शिबिरामध्ये टाटा मोटर्स युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली अविरत श्रमदान, सायकल ग्रुप पुणे, आणि इंद्रायणी व नगर व मोशी प्राधिकरण सोसायटी हौसिंग फेडरेशन यांचे विशेष सहकार्य लाभले.
























Join Our Whatsapp Group