पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील जगताप कुटुंबाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांत्वन केले. पवार यांनी विराज जगताप याच्या घरी आज (दि.१४) भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे उपस्थित होते.
गेल्या आठवड्यात विराज जगताप या तरुणाचा पिंपळे सौदागर मध्ये खून झाला होता. याप्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना ऑनर किलिंगचा प्रकार असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जगताप कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देखील दिले.























Join Our Whatsapp Group