पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्यावतीने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभिप्राय अभियान’ हाती घेतले असून त्यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांना सहभागी करून घेण्यासाठी खास वेबसाईट लॉन्च केली आहे. https://bit.ly/RashtravadiPakshAbhipraay अशी या वेबसाईटची लिंक आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आपले अभिप्राय नोंदवून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील माणसांपर्यंत पोचून त्यांची पक्ष्याबद्दलची भूमिका जाणून घेण्याचा हा प्रयत्न असून राज्यात सर्वत्र हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे वाघेरे पाटील म्हणाले. यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रवक्ते फजल शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष सुनिल गव्हाणे, कायदा सेलचे अध्यक्ष गोरक्ष लोखंडे आदी उपस्थित होते.
अधिक माहिती देताना संजोग वाघेरे पाटील म्हणाले, ‘२२ मे पासून पक्षाची वर्धापनदिन मोहीम सुरू झाली. आतापर्यंत ५ लाख लोकांपर्यंत पोहचलो आहोत. अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आतापर्यंत पक्षस्तरावर किंवा सरकारच्या माध्यमातून केलेल्या कोणत्या योजना, कामे तुम्हाला आवडली, पक्षाबद्दल आपणास काय वाटते, पक्षाकडून आपल्या कोणत्या अपेक्षा आहेत याची माहिती एका फॉर्मद्वारे कार्यकर्त्यांनी भरून द्यावयाची आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतही तीन वर्षांपूर्वी सलग पंधरा वर्षे पक्षाची सत्ता होती. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक प्रकल्प या शहरात आणले. अगदी मूलभूत सुविधांपासून रस्ते, उड्डाणपूल, उद्याने, मनोरंजन, आरोग्य, शिक्षण, उद्योग, बांधकाम अशा विविध क्षेत्रांत प्रगती केली.
‘सध्या राज्य आणि देश कोरोनाच्या गंभीर संकटातून जात आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केली आहे की, त्यांनी हा उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावा. आपल्यापुढे कोरोनाचे मोठे आव्हान आहे. या विषाणूच्या विरोधात झगडताना आतापर्यंत साडेतीन हजारांपेक्षा जास्त लोकांनी राज्यात जीव गमावला आहे. आपले डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी तसेच प्रशासकीय अधिकारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना विरुध्दची लढाई सक्षमपणे लढच आहेत. काही जणांनी या लढाईत आपले प्राण सुध्दा गमावले आहेत. या ख-या वीरांना भावपूर्ण ऋद्धांजली आणि सलाम ! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. त्यासाठी शरद पवार यांनी राज्यभर रक्तदान शिबिराचे नियोजन जिल्हा आणि तालुका पातळीवर करण्यास सांगितले होते. त्यास भव्य प्रतिसाद देत संपूर्ण शहरात ५०० पेक्षा अधिक दात्यांनी रक्तदान करुन या लढाईत आपले योगदान दिले आहे. पवार साहेबांनी बूथ समित्या तयार व कार्यान्वित करण्याचे काम जिल्हा पातळीवर हाती घेतले होते.
या मोहिमंतर्गत संपूर्ण राज्यभरामध्ये कार्यकर्त्यांची नोंदणी झाली आहे. जिल्हाभरातील लोकांना मदत करण्यासाठी सर्व कार्यकर्ते सक्रिय आहेत. रेशन वितरण, वैद्यकीय शिबिरे, अन्न वितरण यासारखे लोक उपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. मागील १० ते १५ वर्षामध्ये पिंपरी चिंचवड शहरात खालील प्रमाणे विकास कामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत. अशी माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी देत या अबियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काळातील पूर्ण झालेले महत्वाचे प्रकल्प
१) ग्रेड सपरेटर – निगडी ते दापोडी
२) बास्केट ब्रिज – रावेत
३) मदर तेरसा उड्डाण पूल – चिंचवड स्टेशन
४) भारत रत्न जे.आर.डी. टाटा दुमजली उड्डाण पूल – नाशिक फाटा
५) के.एस.बी. येथील उड्डाण पूल – के.एस.बी. चौक
६) के.एस.बी. येथील ग्रेट सपरेटर – के.एस.बी. चौक
७) डांगे चौक उड्डाण पूल – डांगे चौक
८) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – डांगे चौक
९) काळेवाडी उड्डाण पूल – काळेवाडी
१०) सारथी हेल्प लाईन – देशात रोल मॉडेल म्हणून गौरव झालेली
११) भारतीय तिरंगा – देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज –निगडी
१२) संभाजीनगर येथील अक्वा मरीन जलतरण तलाव
१३) पिंपरी येथील जलतरण तलाव
१४) तालेरा रुग्णालय – चिंचवडगाव
१५) जिजामाता रुग्णालय – पिंपरी
१६) थेरगांव येथील रुग्णालय – थेरगाव
१७) पंडीत जवाहरलाल नेहरू तारांगण, चिंचवड स्टेशन
१८) सायन्स पार्क, चिंचवड स्टेशन
१९) अँटो क्लस्टर- चिंचवड स्टेशन
२०) कै. अंकुश लांडगे नाट्यगृह – भोसरी
२१) निळू फुले नाट्यगृह – पिंपळे गुरव
२२) कुस्ती प्रशिक्षण केंद्र – भोसरी
२३) शिवसृष्टी शिल्प – भोसरी
२४) शिव सृष्टी शिल्प – सांगवी
२५) आई उद्यान – सांगवी
२६) डायनासौर पार्क – पिंपळे सौदागर
२७) लिनिअर गार्डन, पिंपळे सौदागर
२८) दुर्गादेवी टेकडी – निगडी
२९) अप्पूघर – निगडी
३०) भक्ती शक्ती शिल्प – निगडी
३१) मुलां मुलींसाठी स्वंतत्र्य आय.टी.आय. – मोरवाडी, कासारवाडी
३२) घरकूल योजना – चिखली
३३) महाराष्ट्रात आय.एस.ओ. मानांकन प्राप्त करणारी पहिली महानगरपालिका
३४) ई गर्व्हन्समध्ये विशेष कामगारी केल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकाने सन्मानित झालेली पहिली महानगरपालिका
३५) राष्ट्रीय पातळीवर स्वच्छता पुरस्कार व बेस्ट सिटी पुरस्काराने सन्मानित
३६) स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी एका मुलीवर शस्त्रक्रीया करणा-या दापत्यांस पंचवीसहजार, दोन मुलींवर शस्त्रक्रीया करणा-या दापत्यांस मुलीच्या नांवे १० हजार रुपयांची ठेव आणि मुलगी दत्तक घेणा-या दापत्यांस प्रोत्साहानपर बक्षिस देणारी एकमेव महानगरपालिका
३७) निगडी भक्ती शक्ती येथे दुमजली प्रशस्त उड्डाणपूल
३८) संगीत अकादमी, क्रीडा प्रबोधनी, उर्दू माध्यम, इंग्रजी माध्यम विद्यालये
३९) संपूर्ण शहरात महानगरपालिकेची १३ वाचनालये, ग्रंथालये
४०) सावित्रीबाई फुले दोन मजली प्रशस्त ग्रंथालय
४१) संपूर्ण शहरात ६ स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका
४२) संपूर्ण शहरात ७२ व्यायाम शाळा
४३) शहरात मनपा दवाखाने २६ मनपा रुग्णालये ८ मनपा रक्तपेढी १
४४) १ क्षय रोग केंद्र १ एडस नियंत्रण केंद्र १ लॅप्रेसी सेंटर १ पशू रुग्णालय १ पोस्ट मार्टम सेंटर























Join Our Whatsapp Group