पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर परिस्थितीची तयारी सुरू केलीयं. त्याअनुषंगाने आज (दि.१८) आयुक्त, महापौर आणि पदाधिकाऱ्यांचा पाहणी दौरा सुरू होता. त्या दौऱ्या दरम्यान धक्कादायक प्रकार समोर आलायं. जुनी सांगवीतील नदीपात्रात चक्क जुगार अड्डाच राजोसपणे सुरू होता. आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांना पाहताच सर्व मुद्देमाल जागीच टाकून सर्वांनीच तेथून पळ काढलायं.
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, आज आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे समवेत महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेविका शारदा सोनवणे तसेच संबधित अधिकारी यांनी सांगवी भागातील नदीलगतच्या भागात मान्सुन पुर्व पुर नियंत्रण कामाची पाहणी करीत असताना त्या ठिकाणी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये संशयास्पद हालचाली दिसुन आल्या. म्हणून प्रत्यक्ष जावुन पाहणी केली असता काही जणाकडे असणाऱ्या जुगार, मटक्याच्या चिठ्ठ्या, रोख रक्कम व तत्सम साहित्य त्याच ठिकाणी टाकुन पसार झाले. तसेच त्या ठिकाणी विविध मटका बाजाराचे बोर्ड लावलेले व त्यावर ओपन क्लोज नंबर असलेले आढळून आले. अशाच प्रकारे शहरात अवैध मटका, जुगार, सोरट असे मोठ्या प्रमाणात गैरप्रकार चालु असणार आहेत. शहरात कोरोनाचे सावट असताना याकडे मात्र पोलीस प्रशासनाकडुन जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात गरीबांना शोषित केले जात आहे. याकडे पोलीस प्रशासन लक्ष देणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला.
पिंपरी चिंचवड शहरातील अशा प्रकारचे जुगार, मटक्याचे धंदे अनेक ठिकाणी सुरु असण्याची शक्यता आहे. जुगार, मटक्यामुळे या शहरातील अनेक गोरगरीब नागरिकांचे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून अनेक कुटुंबात कौटुंबिक कलह वाढत आहेत हे असेच सुरु राहिले तर अनेक गोरगरीब कुटुंबे व शहरातील युवक या मुळे बरबाद होण्याची भिती आहे, तरी पोलीस यंत्रणेने या अवैध धंद्याकडे वेळीच लक्ष घालुन तातडीने बंद करावा, अशी मागणी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली आहे.
राजकीय वरदहस्तामुळेच सांगवी परिसरात अवैध धंदे – राहुल कलाटे
राजकीय वरदहस्तामुळेच सांगवी, पिंपळे गुरव परिसरात अवैध धंदे सुरू आहेत. आज महापालिका आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यात याचा पर्दाफाश झाला आहे. ५-६ महिन्यापूर्वी मी देखील आयुक्तांना याबाबत तक्रार केली होती. मात्री तरी देखील पिंपळे गुरव, सांगवी परिसरात राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. राजकीय वरदहस्तामुळेच इथे पोलीस कारवाई होत नाही.























Join Our Whatsapp Group