पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पिंपळे सौदागर येथील खुनी हल्ल्यात मृत्यूमूखी पडलेल्या विराज जगताप याच्या कुटूंबियांची आज (दि.१९) भेट घेऊन सांत्वन केले. प्रेम प्रकरणातून खुनी हल्लात गंभीर जखमी मृत्यू झालेल्या विराज जगताप यांची गेल्या आठवड्यात हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती.
या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जगताप कुटूंबियांची आज भेट घेतली. महाराष्ट्र शासनाच्यावतीने ४ लाख २५ हजार रूपयांचा धनादेश मदत म्हणून देण्यात आला. या प्रसंगी विरोधी पक्षनेते विठ्ठल (नाना) काटे, पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई उपस्थित होते. यावेळी गृहमंत्र्यांनी विराज जगताप याची आजी सुभद्रा जगताप व आई यांची भेट घेऊन शासनाकडून सर्व प्रकारची मदत मिळेल तसेच या केससाठी तुम्ही म्हणाल तो वकील शासनाच्यावतीने देण्यात येईल याची ग्वाही दिली. पोलिस आयुक्तांकडून या केसबाबत माहिती घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल याबाबत आश्वासन दिले.























Join Our Whatsapp Group