पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा वर्धापनदिन आज सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील शिवसेना गटनेते नगरसेवक राहुल कलाटे यांच्या वतीने महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मेडिकल किट आणि छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक अमित गावडे, शिवसेना विभाग प्रमुख विशाल यादव, विक्रम वाघमारे आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना योध्दांचा सन्मान, सामाजिक उपक्रम, गरजूंना मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना मेडिकल किट आणि छत्री यांचे वाटप केले. या मेडिकल किटमध्ये एक N95 मास्क, दोन हॅन्ड ग्लोज, पाच साधे मास्क याचा समावेश आहे. तसेच आरोग्य कर्मचारी भर पावसात काम करत असतात, म्हणूनच त्यांना छत्री देखील यावेळी देण्यात आली.
























Join Our Whatsapp Group