पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये आज रविवारी (दि.२८) शहरातील विविध भागात कोरोनाचे नवे १५७ रूग्ण आढळले आहेत. शहराबाहेरील ६ कोरोना बाधित नागरिकांना आज वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आज शहरातील ११५ रुग्ण ‘कोरोनामुक्त’ झाले आहेत. तसेच आज शहरातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज कोरोना झालेले १५७ नागरिक हे कासारवाडी-केशवनगर, पिंपळेसौदागर, विकासनगर, भोसरी-गवळीनगर, थेरगाव-डांगे चौक गणेशनगर, पिंपरी-आदर्शनगर, पिंपळेगुरव-वैदुवस्ती, आकुर्डी, पिंपरी-नेहरूनगर, भोसरी-लांडेवाडी, पिंपरी-विठ्ठलनगर, चिंचवड-दळवीनगर, भोसरी- महात्मा फुलेनगर, पिंपळेगुरव-काशिद पार्क, पिंपरी-डिलक्स चौक, पिंपरी-शगुन चौक, भोसरी-संत तुकारामनगर, पिंपरी-रिव्हर रोड, पिंपरी-कुदळे चाळ, पिंपरी-नव महाराष्ट्र विद्यालय, पिंपरी-बौद्धविहार, पिंपरी-मिलिंदनगर, थेरगाव-कैलासनगर, पिंपळेगुरव-महाराष्ट्र कॉलनी, वाकड-मंगलनगर, पिंपरी-भाटनगर, पिंपरी-सुभाषनगर, पिंपळेनिलख-वालकन सोसायटी, पिंपरी-गुलाबनगर, चिंचवड-तानाजीनगर, पिंपरीगाव-विजय अपार्टमेंट, भोसरी-गणेशनगर, चिखली-पाटीलनगर, भोसरी-दिघीरोड, पिंपरी-वैभवनगर, काळेवाडी-तापकीरनगर, रंजक कॉलनी, भोसरी-इंद्रायणीनगर, दिघी-गणेशनगर, निगडी-रुपीनगर, थेरगाव-बापुजी बुवामंदिर, चिंचवड स्टेशन-इंदिरानगर, काळेवाडी-आदर्शनगर, दिघी-भारतमातानगर, चिंचवड-इंदिरानगर, चिंचवड-संभाजीनगर-शाहूनगर, निगडी-यमुनानगर, भोसरी-जयगणेश साम्राज्य, चिखली-सुदर्शननगर, वाल्हेकरवाडी-भारतमाता हौसिंग सोसायटी, जुनी सांगवी-पटेल गार्डन, पिंपरी-किर्ती हॉस्पिटलजवळ, पिंपरी-बौद्धनगर, काळेवाडी-कोकणेनगर, वाकड, मोशी-शिवाजीवाडी, पिंपरी-रमाबाईनगर, चिंचवड स्टेशन, चिंचवड-काळभोरनगर, पिंपरी-शास्त्रीनगर, दापोडी, नेहरूनगर-वसंतदादा पाटील शाळा, काळेवाडी-नढेनगर, वाल्हेकरवाडी, भोसरी-नंदनवन कॉलनी, थेरगाव-नम्रता कॉलनी, कासारवाडी-जवळकर चाळ, कासारवाडी-हिराबाई झोपडपट्टी, निगडी-चिकन चौक, रावेत-आनंद विहार या भागातील रहिवासी आहेत. शहराबाहेरचे ६ कोरोना बाधित नागरिक हे पुण्यातील हडपसर, मंगळवार पेठ, कोंढवा, जुन्नर आणि चाकण या भागातील रहिवासी आहेत.
पिंपरी-विशालनगर येथील ६० वर्षे वयाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे आज वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला. आज शहरातील १५७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने आतापर्यंत कोरोना झालेल्या शहरातील एकूण रुग्णांची संख्या २ हजार ७२२ झाली आहे. आतापर्यंत शहरातील १ हजार ६४० आणि शहराबाहेरील १६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे पिंपरी-चिंचवडमधील ४४ जणांचा आणि शहराबाहेरील २७ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत एकूण १ हजार ०३५ कोरोना रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.























Join Our Whatsapp Group