पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थेरगाव येथील गणेशनगर, गणपती मंदीर परिसरात अर्सेनिक अल्बक 30 या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. युवा उद्योजक अक्षय परदेशी यांच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील तब्बल १ हजार नागरिकांना यावेळी ह्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी स्थानिक शिवसेना नगरसेवक सचिन भोसले व सामजिक कार्यकर्ते विलासमामा जगदाळे तसेच अनेक जेष्ट नागरीक उपस्थित होते.
थेरगावमध्ये युवा उद्योजक अक्षय परदेशी मित्र परिवाराच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. कोरोनाच्या संकट काळातही त्यांच्यावतीने पोलीसांना मास्कचे वाटप करण्यात आले होेते. त्यानुसारच नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून आयुष मंत्रालय भारत सरकार यांनी सुचविल्याप्रमाणे थेरगाव परिसरातील १ हजार नागरिकांना अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी हे औषध कसेेेेेे खायचे तसेच कोण कोणते पथ्य पाळायचे याबाबत माहिती देण्यात आली. युवा उद्योजक अक्षय परदेशी यांनी राबवलेल्या या उपक्रमांचे कौतुक होत आहे.
























Join Our Whatsapp Group