मुंबई (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक दत्ता साने यांच्या निधनाने जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा झुंजार कार्यकर्ता, चांगला सहकारी गमावल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हटलयं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक दत्ता साने यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने काम केले. महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धडाडीचा कार्यकर्ता गमावला आहे. संघटनेची ध्येयधोरणे तडफेने राबविणाऱ्या या झुंजार कार्यकर्त्याची, सहकाऱ्याची उणीव कायमच जाणवेल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहातील तसेच सामाजिक क्षेत्रातील त्यांचं योगदान पक्ष कार्यकर्त्यांना प्रेरणा देईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.























Join Our Whatsapp Group