पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे संकट वाढत आहे. नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग पाळावे. अगदी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. रोग प्रतिकार शक्ती वाढवा, नियमित मास्क वापरावा, रस्त्यावर थुंकू नये असे आवाहन पिंपळे सौदागर येथील इंजिनिअस होमिओपॅथीक क्लिनिक, काॅस्मेटोलाॅजी व ट्रायकोलाॅजी सेंटरच्या संचालिका व सामाजिक कार्यकर्त्या डाॅ. वेदा नलावडे यांनी केले आहे.
कोराना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. तरच ही विषाणू साखळी आपण तोडू शकतो. सरकार आपले कर्तव्य बजावत आहे. आपणही शासनाच्या आवाहनानुसार जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे असेही डाॅ.वेदा नलावडे म्हणाल्या. ज्या नागरिकांनी आर्सेनिक अल्बम -३० हे रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे होमिओपॅथी औषध एक महिन्यापूर्वी घेतले असेल त्या औषधाचा डोसही पुन्हा घ्यावा असे आवाहनही डाॅ. वेदा नलावडे यांनी केले.























Join Our Whatsapp Group