पिंपरी (Pclive7.com):- मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेले राजगृहावर काही समाजकंटकांनी नासधूस केली होती. त्यामुळे समस्त आंबेडकरी समाजाची अस्मिता दुखावली गेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तूस २४ तास पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी केली आहे.
यासंदर्भात सुरेश निकाळजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस महासंचालकांना ईमेलव्दारे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काही दिवस वास्तव्य केले होते. त्यामुळे ही वास्तू समस्त आंबेडकरी जनतेसाठी पवित्र आहे. मुंबई येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेले राजगृहावर काही समाजकंटकांनी नासधूस केली होती. त्यामुळे समस्त आंबेडकरी समाजाची अस्मिता दुखावली गेली आहे. असाच काही प्रकार पुन्हा घडू नये यासाठी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तळेगाव दाभाडे येथील निवास्थानावर २४ तास पोलीस सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी सुरेश निकाळजे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group