पिंपरी (Pclive7.com): पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक डब्बू आसवानी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह कुटुंबातील चार सदस्यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस बाधित रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनाने राजकीय लोकांना देखील विळखा घातला आहे. आमदार महेश लांडगे यांच्यासह शहरातील सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे.
पिंपरी मतदारसंघातील माजी उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्षपद भुषविलेल्या डब्बू आसवानी यांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी घशातील द्रावाची तपासणी करुन घेतली. त्यामध्ये त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांनाही बाधा झाली आहे.























Join Our Whatsapp Group