पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. शहरातील पोलिस बांधवांना देखील याची लागण मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. पोलिस बांधव दिवसरात्र कोरोनाच्या काळात आपली सेवा करत आहेत. त्यांच्यातील रोग प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून आज भोसरी पोलिस स्टेशन मधील सर्व पोलिस कर्मचा-यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने ‘अर्सेनिक अल्बम- ३०’ या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी पोलिस निरीक्षक शंकर अवताडे, रविराज रघुनाथ साबळे (कार्याध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्य), विशाल डांगे (सदस्य, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्य), वरपे साहेब, गणेश पुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group