पिंपरी (Pclive7.com):- वसंत ग्रुप, रोटरी क्लब ऑफ़ निगडी, निगडी- प्राधिकरण रेसिडेंट फोरम, नॅशनल सोशल ग्रुप आणि एस.के. एम. स्टील्स यांच्या संयुक्त विद्यमाने म्हाळुंगे इंगळे-चाकण येथील कोविड सेंटरला १०० बेड देण्यात आले.
यासाठी उपक्रमासाठी वसंत ग्रुपचे चेअरमन प्रेमचंद मित्तल, अरुण मित्तल, अनिल मित्तल, सुनील मित्तल, रोटरी क्लब निगडीचे अध्यक्ष डॉ.प्रवीण घाणेगावकर, सेवा संचालक मुकुंद मुळे, नॅशनल सोशल ग्रुपचे अध्यक्ष कैलाश पारेख, जिगर व्यास, कीर्ती शहा, ॲड.अर्जुन दलाल यांनी पुढाकार घेतला.
शहरी आणि ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधा अपुऱ्या पडत असल्याने ग्रामस्थांनी मागणी केली होती. वसंत ग्रुपच्या सर्व कामगार, स्टाफ यांनी आपला एक दिवसाचा पगार या उपक्रमासाठी दिला असून वसंत ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर यांनी देखील प्रोत्साहन दिले. व अनिलकुमार मित्तल तसेच एस.के.एम स्टील लिमिटेड मुंबईचे कीर्ती शहा यांच्या हस्ते कोविड सेंटरकडे सुपूर्द केले. यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
ह्या बेडस् मुळे कोरोनाग्रस्तांचे हाल कमी होतील, ग्रामीण गावात ह्याचा अधिक उपयोग होइल, अनेक लोक एकत्र येउन ही मदत केल्याने एक आदर्श लोकांसमोर ठेवला आहे. तसेच सामजिक बांधीलकीचे भान ठेउन काम केल्याने समाजातील अनेक स्तरातून कौतुक होत आहे.























Join Our Whatsapp Group