पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव लॉकडाऊनच्या कालावधीतही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज लॉकडाऊन संपत असला तरी प्रतिबंधक उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने पिंपरीतील भीमनगर आणि पिंपरी गावठाणचा भाग तसेच थेरगावमधील गणेशनगरचा परिसर ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून घोषित केला आहे. आज दि.२३ जुलै रोजी रात्री ११ वाजल्यापासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा परिसर ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून राहणार असल्याचे आदेश महापालकेचे सहा.आयुक्त आयुक्त तथा ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे यांनी दिले आहेत.
● कंटेनमेंट झोनचा परिसर खालील प्रमाणे..
१) भीमनगर, पिंपरी (शिवाजी महाराज पुतळा – गंगवा चौक – समृध्दी हॉटेल – सौदागर पुल – काटे पिंपळे रस्ता)
२) पिंपरी गावठाण (पवनेश्वर मंदीर – कापसे चौक – शिवकृपा – पीसीएमसी कॉलनी – काशीबा शिंदे सभागृह)
३) गणेशनगर, थेरगाव (दुर्गा कॉलनी नं. १- वाकड पोलीस स्टेशन चौक – शिव कॉलनी कमान – ओमकार कॉलनी लेन २ – रत्नदीप कॉलनी – मयुरबाग कॉलनी – मयुरेश्वर गणेश मंदिर – लोकमान्य कॉलनी)
वरील परिसर आज गुरुवार, दि.२३ जुलै २०२० रोजी रात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सदर परिसरातील संबंधित पोलिस स्टेशन प्रमुख यांचे मार्फत सील करण्यात येणार आहे. तसेच सदर कंटेनमेंट परिसरांच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी असणार आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.
■ आदेश लागू झाल्यापासून निर्बंध खालील प्रमाणे
१. अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरवठादार यांचे पैकी वर नमुद भागातील कन्टेनमेंट झोन अंतर्गत किराणा दुकानदार व मांसाहारी पदार्थ, अंडी विक्रेते / दुध विक्री सकाळी ८:०० ते दुपारी १२ : ०० पर्यंत, अंतर्गत भाजी विक्रेते सकाळी ८:०० ते दुपारी १२:०० पर्यंत व औषध विक्रेते, वैद्यकिय आस्थापना पुर्ण वेळ सुरू रहातील.
२. Zomato , Swiggy व तत्सम ऑनलाईन पोर्टल वरून मागविले जाणारे खाद्यपदार्थ पुरवठा सेवा बंद राहतील.
३.पेट्रोल पंप व गॅसपंप सकाळी ८.०० ते दुपारी १२.०० या वेळेत सुरू रहातील व ते केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहनास ईधन पुरवठा करतील.
४.एलपीजी गॅस सेवा घरपोच गॅस वितरण नियमानुसार राहील.
५. पाणीपुरवठी करणा-या टैंकरला नियमानुसार परवानगी राहील.
६. सर्व वैद्यकिय व्यावसायीक परिचारिका, पॅरामेडीकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व अँम्ब्युलन्स यांना शहराअंतर्गत बाहातुकीसाठी परवानगी राहील.
७. वृध्द व आजारी व्यक्तींकरीता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सेवा सुरू राहतील.
८. अत्यवश्यक सेवा व इतर साठी नियमानुसार पास मिळाला असल्यास त्यांना केवळ आपल्या दुचाकी, चारचाकी दैनंदीन ये-जा करणेसाठी भीमनगर कन्टेन्टमेंट झोन मधील गंगवा चौकाजवळील १०० फुटी रस्त्यावर तसेच पिंपरी गावठाण कंटेनमेंट झोनसाठी पवनेश्वर मंदिर परिसराजवळील sealing point बाहेर पार्क करणेस परवानगी देण्यात येईल. त्यांनी आपला पास व ओळखपत्र सोबत ठेवावे.
९. अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठी भीमनगर कन्टेन्टमेंट झोन मधील गंगवा चौकातील १०० फुटी रस्ता तसेच पिंपरी गावठाण कंटेनमेंट झोन साठी पवनेश्वर मंदिराजवळील रस्ता तात्पुरता खुला राहील. इतर सर्व रस्ते बंद राहतील.
१०. अत्यवश्यक सेवा व इतरसाठी नियमानुसार पास मिळाला असल्यास त्यांना केवळ आपल्या दुचाकी, चारचाकी दैनंदीन ये-जा करणेसाठी मयुरेश्वर मंदीर येथील sealing point बाहेर पार्क करणेस परवानगी देण्यात येईल. त्यांनी आपला पास व ओळखपत्र सोबत ठेवावे.
११. अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठी गणेशनगर कन्टेन्टमेंट झोन मधील मयुरेश्वर मंदीर येथील रस्ता तात्पुरता खुला राहील. इतर सर्व रस्ते बंद राहतील.
१२. या व्यतीरिक्त सर्व आस्थापना बंद राहतील.
▪१) सदर आदेशान्वये कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी व वाहने तसेच शासकीय व सेवा देण्यात येणाऱ्या वाहनांना सदरच्या आदेशानुसार कंटेनमेंट झोन व बफर झोन कार्यवाहीमधून वगळण्यात आले आहे.
▪२) उपरोक्त नमुद कंटेनमेंट झोन क्षेत्रातील नागरिकांच्या बॅकींग सुविधांसाठी सर्व बँकांनी शाखा बंद राहतील व बँकांनी केवळ ए.टी.एम.केंद्रे कार्यान्वीत ठेवावीत.
▪३) वैद्यकिय विभागामार्फत सर्व क्षेत्रिय कर्मचारी यांनी उपरोक्त नमुद कंटेनमेंट झोन व बफर झोन येथे राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार ILI / SARI / ६० वर्षाच्या वरील/असंसर्गजन्य व दुर्धर आजारांनी ग्रस्त व्यक्तींचे सर्वेक्षण दररोज होईल. तसेच पुढील काळात शहरातील रुग्णांची संख्या विचारत घेता टप्प्याटप्प्याने शहरातील इतर भागांत देखील या प्रकारचे निबंध लागू करण्याबाबत आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी किमान सात दिवसांसाठी लागणारे जीवनाश्यक साहित्य गर्दी न करता प्राप्त करुन घेऊन पूर्वतयारी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.























Join Our Whatsapp Group