मुंबई (Pclive7.com):- पुणे जिल्ह्यातील शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यासोबत मुंबईत बैठक पार पडली. सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणे, सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणीसाठी प्रयत्न केले जातील, असे मंत्री केदार यांनी सांगितले.
बैलगाडा शर्यत बंदी उठविण्याबाबत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी आज (गुरुवारी) मुंबईत बैठक आयोजित केली होती.
बैठकीला शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, नरेंद्र पाटील, बैलगाडा संघटनेचे बाळासाहेब आरूटे, नितीन शेवाळे, धनाजी शिंदे, संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर, अमोल हरपळे आणि पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. परकाळे, सहआयुक्त डॉ. प्रशांत भड, अवरसचिव डॉ. सं. श्री. पंचपोर, सहसचिव माणिक गुट्टे आदी उपस्थित होते.
राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल. राज्याचे महाधिवक्ता आशिष कुंभकोणी यांच्याशी चर्चा करून सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणी व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री केदार यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group