पिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे नवनियुक्त अध्यक्ष रो. सचिन काळभोर आणि सचिव रो. सचिन खोले यांनी 9 ऑगस्ट 2020 रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून पदभार स्वीकारला. अध्यक्ष, सचिव व नवनिर्वाचित संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा पार पाडला.
रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचा हा पदग्रहण सोहळा भारतातील पहिल्या महिला रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. रश्मी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी असिस्टंट गव्हर्नर संतोष अग्रवाल, डिस्ट्रिक्ट टीम, देशातील आणि जगभरातील रोटरी सदस्य झुम मीटिंगद्वारे उपस्थित होते. यावेळी सन 2019-20 या मागील वर्षीचे प्रेसिडेंट रो. अँड. सोमनाथ हारपुडे यांनी रो. सचिन काळभोर यांच्याकडे पदभार देताना त्यांचे कालावधीमध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच कोविड-19 मुळे उद्भवलेल्या या कठीण परस्थितीत मेडिकल प्रोजेक्ट्स, हॉस्पिटलला पीपीई किट, सॅनिटायझर, तुरटी वाटपसारखे उपक्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले.
नवनिर्वाचित अध्यक्ष रो. सचिन काळभोर पदभार स्वीकारताना म्हणाले की, “2020-21 या कालावधीमध्ये मध्ये नवीन सदस्य रोटरी परिवारात समाविष्ट करून रोटरी जास्तीत जास्त जनमानसात रुजविण्याचा मानस आहे. सर्वांचे सहकार्याने वेगवेगळे क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त प्रोजेक्ट करून गेल्या 3 वर्षांपासून काम चालू असलेल्या पवना नदी जलपर्णी मुक्त, सांडपाणी विरहीत आणि प्रदूषण मुक्त करणे यासाठी ग्लोबल ग्रँट मिळवून स्वच्छ पाणीपुरवठा देण्यासाठी प्रयत्नशील राहू”. नदीची प्रदूषण पातळी, सांडपाण्याची परिस्थिती मुळे उदभवणारे नदी प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असे ही यावेळी त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थापक अध्यक्ष प्रदिप वाल्हेकर यांनी केले. तसेच स्वाती प्रदीप वाल्हेकर, स्वाती सूनील वाल्हेकर, सोमनाथ हरपुडे, राजेंद्र चिंचवडे, सुधीर मरळ शेखर चिंचवडे, अतुल क्षिरसागर, रामेश्वर पवार, गणेश बोरा आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group