मुंबई (Pclive7.com):- मुंबईत मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाच्या सरींनी सकाळपासून जोरदार पावसाचे रूप घेतले आहे. हवामान विभागाने मुंबई शहरासह उपनगराला शुक्रवारसाठी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात व उपनगरात शुक्रवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय दिवसभर ४५ ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. मुंबईत वाऱ्याचा वेग ६० किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईतील समुद्रात भरतीमुळे सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास उंच लाटा उसळण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सायंकाळच्या सुमारास समुद्रकिनारी फेरफटका मारण्यास जाऊ नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.





















Join Our Whatsapp Group