पिंपरी (Pclive7.com):- कोरोना महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा जरी गणेशोत्सव साजरा करण्यावर काहीसे निर्बंध आलेले असले, तरी गणेश भक्तांचा उत्साह मात्र तोच आहे. परंपरेनुसार गणपती बाप्पाचे आगमन प्रत्येकाच्या घरी होणार आहे. दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो आम्हाला पाठवा..!
येई एक मंगल क्षण, श्रीगजाननाचे होता आगमन
कला-कल्पनांचे अधिष्ठान, लाभो श्रींचे वरदान!
उत्सवा येतसे उधाण, जपावेत अनमोल क्षण
वाटूया आनंद आपुला इतरांसवे, उपक्रम एक चिरंतन!
गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो [email protected] या ई-मेलवर किंवा 8208931284 या व्हॉटस्अँप नंबरवर पाठवा. फोटोसोबत आपले नाव आणि पत्ता (मराठीमध्ये) लिहावे. आपल्या गणपती बाप्पाचा फोटो आमच्या ‘Pclive7.com’ या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल. त्याचप्रमाणे फोटोची लिंक ‘Pclive7.com’ या आमच्या फेसबुक पेजवरूनही आपण शेअर करू शकता.
तुमचा आणि बाप्पाच्या फोटोसह खालील माहिती आम्हाला पाठवावी..!
नाव –
पत्ता –
व्हॉटसअँप नंबर –






















Join Our Whatsapp Group