पिंपरी (Pclive7.com):- ग्लोबल व्हीजन फाऊंडेशनच्या वतीने २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या दरम्यान असलेल्या नेत्रदान पंधरवड्यानिमित्ताने नेत्रदानाची शपथ घ्या आणि मोफत नेत्र तपासणी करून घ्या अशा प्रकारच्या समाजाभिमुख शिबिराचे आयोजन करण्यात आहे. हे शिबीर सांगवीच्या शितोळेनगर मधील नित्यसेवा आय हॉस्पिटल आणि पिंपळे सौदागर येथील ग्लोबल आय इंस्टीट्यूट या ठिकाणी होणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. बबन डोळस यांनी दिली.
ग्लोबल व्हीजन फाऊंडेशन संचलित नेत्रतज्ञ डॉ.बबन डोळस यांच्या पुढाकाराने नुकतेच या फाऊंडेशनला राष्ट्रीय आरोग्य मानांकन संस्थेचे NABH गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
डॉ.डोळस यांनी 2008 साली सुरू केलेली नेत्रपेढी हि पिंपरी चिंचवड परिसरातील पहिलीच पेढी ठरली. राष्ट्रीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत ते अनेक मोफत नेत्र व नेत्र शस्त्रक्रिया शिबिरे राबवित आले आहेत. या शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सांगवीसाठी ८८००६६८४५५ तर पिंपळे सौदागर परिसरातील नागरीकांनी 7378840004 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
नुकतेच माननीय महापौर माई ढोरे यांनीही मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प डॉ. बबन डोळस यांच्याकडून नेत्र तपासणी करून घेताना व्यक्त केला आहे.























Join Our Whatsapp Group