पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लक्षणे असलेल्या नागरिकांकडून भितीपोटी कोरोनाच्या टेस्टसाठी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची प्रकृती बिघडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कोरोनामुक्त शहरासाठी सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी न घाबरता वेळत कोविड टेस्ट करून घ्यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केले आहे.
यासंदर्भात भापकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शाहूनगर येथील बीएसएनएल आरटीटीसी भवनात कोविड सदृश्य रुग्णांच्या अँटीजीन्स व आरटी पीसीआर टेस्टिंग करण्याचे सेंटर २६ जून २०२० रोजी सुरू करण्यात आले आहे. हे सेंटर डॉ. एच.ए. शेंडे व त्यांच्या टीमने अतिशय सुनियोजित व शिस्तबद्ध रित्या सुरू ठेवले असून सकाळी दहा ते चार या वेळेत रोज चारशे ते पाचशे लोकांच्या टेस्टिंग येथे होतात. आत्तापर्यंत तेरा हजारापेक्षा अधिक लोकांच्या टेस्टिंग याठिकाणी झाल्या आहेत. शहरात कोविड रुग्णांचे संक्रमण व मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढत आहे. त्याच धर्तीवर मोहननगर, काळभोरनगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, रामनगर, दत्तनगर, विद्यानगर, परशुरामनगर, शंकरनगर, इंदिरानगर लालटोपीनगर, टिपू सुलताननगर आदी परिसरात देखील रुग्णसंख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे.
यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर कोविड सदृश्य आजाराचे लक्षणे (सर्दी, ताप, डोके दुखणे, जुलाब होणे, अंगदुखी, तोंडाची चव जाणे, वास न येणे आदि लक्षणे) असणाऱ्या लोकांनी न घाबरता दुखणे अंगावर न काढता वेळेत वरील ठिकाणी जाऊन कोवीड टेस्ट करूण घ्यावी. म्हणजे वेळेत उपचार होतील व मृत्यूदर हि घटेल तसेच संक्रमण प्रक्रिया खंडित होईल. यासाठी आम्ही गेली दिड महिन्यांपासून वरील परिसरातील शेकडो नागरिकांना या सेंटर पर्यंत नेहून टेस्टिंग करून घेण्याचे काम आम्ही करत आहोत. त्यानंतर सौम्य लक्षने असणार्या रुग्णांना महापालिका अथवा खाजगी रुग्णालयात बेड मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
तीव्र लक्षण असणाऱ्या अथवा श्वास घेण्यास त्रास होत असणाऱ्या, धाप लागणाऱ्या रुग्णास ऑक्सिजन बेड मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तरी आपल्या परिसरातील नागरिकांनी वरील ठिकाणी कोविडची टेस्ट करुन कोविडमुक्त पिंपरी चिंचवड शहर होण्यासाठी जास्तीत जास्त या प्रक्रियेचा भाग व्हावा असे आवाहन मारूती भापकर यांनी केले आहे.























Join Our Whatsapp Group